Gold Silver Price Today : भारतीय फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत. आज, मंगळवार, २७ डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव ०.०७ टक्क्यांनी वाढला आहे. चांदीचा भाव ०.२८ टक्क्यांच्या वाढीसह ६९००० रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी, MCX वर सोन्याचा दर ०.२० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि चांदीचा भाव ०.०७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
मंगळवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (Gold Rate Today ) कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९:१० पर्यंत ४० रुपयांनी वाढून ५४,७१७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव ५४,७६४ रुपये झाला. काल MCX वर सोन्याचा भाव १०९ रुपयांच्या वाढीसह ५४६८३ रुपयांवर बंद झाला.
चांदीमध्ये वाढ
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात तेजी आली आहे. चांदीचा दर आज १९० रुपयांनी वाढून ६९२६५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीचा दर आज ६९२७९ रुपयांवर उघडला. किंमत एकदा ६९३८० रुपयांवर गेली. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव ४६ रुपयांनी वाढून ६९०७९ वर स्थिरावला .
हेही वाचा – Fact Check : कोरोनामुळे भारतात ७ दिवसांचं लॉकडाऊन? रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत सगळं बंद?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव वधारले
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सोन्याची स्पॉट किंमत आज ०. ३४ टक्क्यांनी वाढून १८०४.७५ डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत आज ०.६१ टक्क्यांनी वाढून २३.८९ डॉलर प्रति औंस झाली आहे.
स्पॉट मार्केटमध्ये तेजी होती
गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. गेल्या व्यापार आठवड्याच्या सुरुवातीला (19 डिसेंबर ते 23 डिसेंबर) २४ कॅरेट सोन्याचा दर ५४२४८ रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी ५४३६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी, ९९९ शुद्ध चांदीची किंमत गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ६६८९८ रुपये होती, जी शुक्रवारपर्यंत ६७८२२ रुपये प्रति किलोवर गेली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!