Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसानंतर, आज, मंगळवार २२ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली असली तरी चांदीच्या स्पॉट किमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव ०.२१ टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे. बाजारात आज चांदीचा दर (Silver Price Today) देखील ०.८० टक्क्यांनी वाढला आहे.
मंगळवारी, २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव बाजारात सकाळी ९:०५ पर्यंत १०८ रुपयांच्या वाढीसह ५२,४०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोन्याचा भाव आज ५२,४७५ रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर काही वेळातच त्यात थोडीशी घसरण झाली आणि किंमत ५२,४०० रुपये झाली.
चांदीही वाढली
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. आज चांदीचा दर ४८६ रुपयांनी वाढून ६१,१२१ रुपयांवर आहे. चांदीचा भाव ६१,१३४ रुपयांवर उघडला. एकदा किंमत ६१,२९७ रुपयांवर गेली. पण नंतर किंमत थोडी कमी होऊन ६१,१३४ रुपये झाली.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,९२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे.
हेही वाचा – Horoscope Today : मिथुन, कर्क सोबत ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, वाचा तुमचे आजचे…
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.