‘सोमवार’ हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’कडून घोषणा!

WhatsApp Group

Guinness World Records : सोमवार – आठवड्याचा तो दिवस, जो कदाचित कोणालाही आवडत नाही. शाळेत जाणारे लहान मूल असो किंवा कॉर्पोरेट कार्यालयात जाणारे व्यावसायिक असो, सोमवार सर्वांच्यात डोळ्यात पाणी आणतो. रविवारचा वीकेंड संपताच, आता सोमवारी ऑफिस किंवा शाळेत जावे लागणार, याचीच लोकांना सर्वाधिक चिंता असते. हे फक्त आपणच म्हणत नाही असे नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक विक्रमाचे वितरण करणाऱ्या संस्थेलाही सोमवार आवडत नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हटले आहे. होय, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्वीट करून याची घोषणा केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोमवारी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही अधिकृतपणे सोमवार हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून चिन्हांकित करत आहोत.” गिनीजने हे ट्वीट चेष्टेमध्ये केले आहे की प्रत्यक्षात सोमवारचे नाव आठवड्यातील सर्वात वाईट दिवस आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु लोकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – BREAKING : रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष..! गांगुली आता ‘इथं’ जाणार?

Leave a comment