

Rs 1000 New Note PIB Fact Check : तुम्हालाही सोशल मीडियावरून असा काही मेसेज आला आहे का की नवीन वर्षात १००० रुपयांची नवी नोट येईल आणि २०००० च्या नोटांवर बंदी घातली जाईल. जर उत्तर हो असेल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. २०१८-१९ नंतर २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट देण्यात आलेला नाही, याची पुष्टी केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत केली होती. यानंतर सोशल मीडियावर वाढत्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये १ जानेवारी २०२३ पासून १००० रुपयांच्या नोटा परत येत असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यात असेही सांगितले जात आहे की, यासोबतच २००० रुपयांच्या नोटाही बँकेत परत येतील. पण हा दावा खरा नाही.
काय खरं?
वाचकांनी अशा कोणत्याही बातम्यांबाबत अपडेट राहणे आवश्यक आहे ज्यामध्ये खोटे दावे केले जात आहेत. २००० रुपयांच्या नोटा बाद करून १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. नोटाबंदीच्या काळात सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी आरबीआयने २००० रुपयांची नवी नोट जारी केली.
हेही वाचा – FIFA World Cup 2022 : आईला पाहून लहान मुलासारखा रडला मेस्सी..! Video होतोय तुफान व्हायरल; पाहा!
दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करू नका..
केंद्र सरकारचे अधिकृत तथ्य तपासक ‘पीआयबी फॅक्ट चेक’ ने लोकांना असे खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश फॉरवर्ड करण्यापासून चेतावणी दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले. कृपया असे दिशाभूल करणारे संदेश फॉरवर्ड करू नका, हे ट्वीट पीआयबीने १६ डिसेंबर रोजी केले आहे.
सोशल मीडिया पर वायरल वीडियों में दावा किया जा रहा कि 1 जनवरी से 1 हजार का नया नोट आने वाले हैं और 2 हजार के नोट बैंकों में वापस लौट जाएंगे। #PIBFactCheck
▶️ये दावा फर्जी है।
▶️कृपया ऐसे भ्रामक मैसेज फॉरवर्ड ना करें। pic.twitter.com/rBdY2ZpmM4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 16, 2022
अलीकडेच, अर्थ मंत्रालयाच्या वतीने संसदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना असे सांगण्यात आले की, २०१८-१९ पासून २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी प्रेसला कोणतीही नवीन मागणी देण्यात आलेली नाही. याशिवाय, बनावट नोटांच्या चलनाबाबत माहिती देताना अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत उत्तर दिले होते की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकिंग प्रणालीमध्ये २,३०,९७१ बनावट नोटा आढळून आल्या.