दारूची एक्सपायरी डेट असते का? वाइन आणि बीयर किती लवकर खराब होते?

WhatsApp Group

Alcohol Expiry Date : ‘’जितकी जुनी, तितकी भारी!” ही म्हण आपण मद्याबद्दल अनेकदा ऐकतो. पण हे खरंच कितपत योग्य आहे? वाइन, बीयर आणि स्प्रिट्स जसे की व्हिस्की, जिन, रम यांनाही एक शेल्फ लाईफ (Shelf Life) असते का? आणि जर बॉटल उघडली असेल, तर ती किती काळ टिकू शकते? चला जाणून घेऊया, कोणती दारू किती काळ टिकते आणि तिची एक्सपायरी डेट असते की नाही!

वाइन आणि बीयर लवकर का खराब होतात?

वाइन आणि बीयर या दोघांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण तुलनेत कमी असतं, वाइनमध्ये साधारणतः 12-15% आणि बीयरमध्ये 4-8% पर्यंत. त्यामुळे या पेयांमध्ये बॅक्टेरिया आणि ऑक्सिडेशनचा प्रभाव लवकर जाणवतो, आणि चवही खराब होते. उघडलेली वाइन 5-6 दिवसांत खराब होऊ शकते, तर बीयर तर काही तासातच आपला स्वाद गमावते.

व्हिस्की, रम, टकीला आणि वोदका इतकी टिकाऊ का?

या स्प्रिट्समध्ये 40% पेक्षा अधिक अल्कोहोल असल्यामुळे त्या बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजंतूंपासून सुरक्षित राहतात.
जर या बोतल सीलबंद आणि योग्य तापमानात ठेवली असेल, तर ती वर्षानुवर्षे खराब होत नाही. एज्ड व्हिस्की म्हणजे जी अनेक वर्ष लाकडी बॅरलमध्ये ठेवली जाते, ती चवदार आणि महागडीही असते.

हेही वाचा – श्रावणात सापाचे दर्शन? जाणून घ्या शिवकृपेचा ‘हा’ अद्भुत संकेत!

एकदा बॉटल उघडल्यानंतर काय करावं?

  • स्प्रिट्स (व्हिस्की, रम, जिन) उघडल्यानंतर 1 वर्षाच्या आत वापरणं योग्य.
  • वाइन 5 दिवसांत, तर बीयर उघडल्यानंतर काही तासांत वापरा.
  • बोतल व्यवस्थित बंद ठेवा आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.

एक्सपायरी डेट खरंच असते का?

तज्ज्ञ सांगतात की शराबी पेयांची शेल्फ लाईफ असते आणि ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते:

  • अल्कोहोलचं प्रमाण
  • बोतल बंद आहे की उघडलेली?
  • साठवण्याची जागा आणि तापमान

निष्कर्ष

“जुनी दारू चांगली असते” हे काही अंशी खरं आहे, पण ती केवळ व्हिस्की किंवा रमसारख्या स्प्रिट्ससाठी लागू होते. वाइन आणि बीयर वेळेत न संपवल्यास त्यांचा स्वाद आणि प्रभाव दोन्ही गमावतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment