तुम्ही व्हेज दूध पिता की नॉन-व्हेज? ‘Non Veg Milk’ म्हणजे काय आणि भारतात त्यावर वाद का सुरू आहे?

WhatsApp Group

Non Veg Milk : भारतात बहुतांश नागरिक दूध हे शुद्ध शाकाहारी समजून आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवतात. उपवास, पूजा किंवा फळाहार असो, दूध हा प्रत्येक घराचा अविभाज्य घटक आहे. पण अलीकडे एक वाद पेटला आहे, दूध नक्की शाकाहारी आहे की मांसाहारी?

अमेरिकेतील डेअरी फॉर्ममध्ये गायींना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे ‘नॉन-व्हेज दूध’ ही संकल्पना चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अमेरिकन डेअरी उत्पादनांच्या आयातीवर आक्षेप घेतला आहे.

काय आहे ‘नॉन-व्हेज दूध’?

अमेरिका, ब्राझील, युरोपसारख्या देशांतील काही डेअरी फार्ममध्ये गायींना खालील घटक असलेला चारा दिला जातो:

  • मृत जनावरांच्या हाडांचे चूर्ण
  • मासळीपासून तयार केलेले पावडर
  • कोंबडीचा वेस्ट
  • डुक्कर किंवा गायांची चरबी

अशा पशुजन्य पदार्थांचा वापर गायींच्या आहारात केल्यास, धार्मिक दृष्टिकोनातून त्या गायीचे दूध ‘शुद्ध शाकाहारी’ राहत नाही, असं भारतातील अनेक समुदायांचं म्हणणं आहे.

का दिला जातो असा चारा?

उद्योगिक पातळीवर दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी गायींच्या आहारात प्रथिने, फॅटी अ‍ॅसिड आणि अतिरिक्त कॅलोरी वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. हे सर्व पशुजन्य घटक स्वस्त आणि पौष्टिक मानले जातात.

भारताचा विरोध – ‘धार्मिक संवेदना महत्त्वाच्या’

भारत सरकारने अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालत स्पष्ट केलं आहे की, “ज्या गायींना मांसाहारी चारा दिला जातो, त्यांचे दूध किंवा दूधजन्य पदार्थ भारतात विकले जाऊ शकत नाहीत.” भारताने ही बाब धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून नॉन-नेगोशिएबल रेड लाइन ठरवली आहे. तर अमेरिकेने भारताच्या भूमिकेला अनावश्यक व्यापार अडथळा ठरवत नाराजी व्यक्त केली आहे.

FSSAI चा मोठा प्रस्ताव

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने 2021-22 मध्ये प्रस्ताव मांडला होता की, “ज्या दूधात किंवा उत्पादनांमध्ये मांसाहारी चारा खाल्लेल्या जनावरांचं दूध वापरलं गेलं आहे, त्यावर ‘नॉन-व्हेज दूध’चा लाल चिन्ह असावा.” या प्रस्तावाला अनेक परदेशी कंपन्यांनी विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की दूध हे जनावराच्या शरीरातून तयार होतं, त्यामुळे ते शाकाहारीच मानलं पाहिजे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment