वजन-बिजन सगळं कमी होतंय, फक्त ‘जिऱ्याचं पाणी’ तुमच्या आयुष्यात आणा!

WhatsApp Group

Jeera water Diet : भारतीय घरांमध्ये सामान्यतः मसाला म्हणून जिरं वापरलं जातं. जिरं जेवणाची चव वाढवण्याचं काम करते. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये जिऱ्याचा विशेष वापर विविध कारणांनी केला जातो. त्यात जिरा राईस, डाळ आणि करी इत्यादींचा समावेश आहे. जिरं केवळ जेवणाची चव वाढवण्याचं काम करत नाही, तर जिरं अनेक आरोग्यदायी फायदेही देतं. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचं काम करतं. तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून देखील जिऱ्याचं सेवन करू शकता.

जाणून घेऊया रोज सकाळी जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे..

जिरं पाणी कसं बनवायचं?

जिरं पाणी बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचे जिरं, दीड ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मध लागेल. कढईत जिरं टाका. ५ ते ६ मिनिटं मंद आचेवर गरम होऊ द्या. त्यानंतर वरून पाणी घाला. जिऱ्याचं पाणी उकळू द्या. ३ ते ५ मिनिटं झाकून ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी त्यात मध टाका. आता याचं सेवन करा. हे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

अँटिऑक्सिडंट्स

जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्याचं काम करतं. अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेच्या वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यासाठी कार्य करतात.

हेही वाचा – तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका? वयाच्या तिशीनंतर कसा असावा दिनक्रम? वाचा!

रक्तातील साखरेची पातळी

जिऱ्याच्या पाण्याचं सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं काम करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन खूप फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी तुम्ही नियमितपणे जिरं पाणी देखील घेऊ शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करतं..

जिऱ्यामध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचं काम करतात. ते हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचं सेवन करू शकता.

आयबीएस स्थिती

इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा आयबीएसनं त्रस्त असलेल्यांनी जिऱ्याचं पाणी नियमित सेवन करावं. जिरं पाणी आतड्यांसंबंधी रोगांवर अत्यंत फायदेशीर आहे.

हेही वाचा – टायरचा रंग काळाच का असतो? पांढरे, हिरवे, निळे असे का नसतात? घ्या जाणून!

जिरं आणि दालचिनी

दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुम्ही जिरं आणि दालचिनी एकत्र करूनही पाणी बनवू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात १ चमचा जिरं आणि दालचिनीचा तुकडा टाका. सकाळी हे पाणी उकळून प्यावं. यामुळं वजन कमी करण्यात खूप मदत होऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment