समोसा, जिलेबीवर आता सिगरेटसारखी वॉर्निंग!, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group

Junk Food Warning India : आता समोसा, जलेबी, वडा-पाव आणि लाडूसारख्या पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांवरही सिगरेटप्रमाणे ‘हेल्थ वॉर्निंग’ लिहिलेली दिसू शकते! होय, हे ऐकून आश्चर्य वाटले तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आता जंक फूडवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जंक फूड खाण्याआधी मिळणार ‘चेतावणी’

AIIMS आणि इतर केंद्रीय संस्थांना आदेश देण्यात आले आहेत की जिथे हे अन्न विकले जाते, तिथे एक स्पष्ट सूचना लावावी:
“या खाद्यपदार्थात किती साखर आणि ट्रान्स फॅट आहे हे जाणून घ्या”.
हे भारतामध्ये प्रथमच घडत आहे की जंक फूडवर सिगरेटसारखी आरोग्यविषयक चेतावणी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

लाडू ते वडापाव — सर्व आले रडारवर!

सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच कॅफे, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक स्थळी हे संकेत बोर्ड लावले जातील. यामध्ये गुलाबजामुन, समोसा, जलेबी, वडा पाव, बर्फी, पकोडे अशा अनेक पदार्थांचा समावेश असेल.

“ट्रान्स फॅट आणि साखर हे नवे तंबाखू”

कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (नागपूर) चे अध्यक्ष डॉ. अमर अमाळे म्हणतात, “साखर आणि ट्रान्स फॅट हेच आजचे नवे तंबाखू आहेत. लोकांनी काय खात आहेत हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे.”

हेही वाचा – प्रेमभंगाची वेदना… तरुण 6 दिवस जंगलात एकटाच!

2050 पर्यंत 45 कोटी भारतीय ठराविक वजनापेक्षा जास्त होणार?

एका संशोधनानुसार, 2050 पर्यंत जवळपास 44.9 कोटी भारतीय लोक लठ्ठपणाच्या विळख्यात अडकू शकतात. यामुळे भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल.

डॉक्टरांचं स्पष्टीकरण

डायबेटोलॉजिस्ट डॉ. सुनील गुप्ता म्हणतात, “ही कोणतीही बंदी नाहीये. पण जर लोकांना कळालं की एका गुलाबजामुनमध्ये 5 चमचे साखर असते, तर ते पुन्हा खाण्याआधी दोनदा विचार करतील.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment