

LPG Cylinder Price : व्यावसायिक स्तरावर एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. १ मे २०२३ पासून, १९ किलोचे व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर १७१.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ANI कडून कळले आहे की दिल्लीत आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किरकोळ किंमत १८५६.५० रुपये आहे.
व्यावसायिक सिलेंडरचे नवीन दर
१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची मुंबईत किंमत १८०८.५० रुपये आहे, तर कोलकाता यासाठी १९६०.५० रुपये आकारते. चेन्नईमध्ये आजपासून १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २०२१.५० रुपये आहे.
हेही वाचा – Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांची जाऊ शकते दृष्टी..! कायमचे येईल अंधत्व; ‘या’ सवयी बदला!
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) नुसार, दिल्लीमध्ये १९ किलो LPG सिलेंडरची किंमत पूर्वी २०२८ रुपये होती. तर, कोलकात्यात २१३२ रुपये, मुंबईत १९८० रुपये आणि चेन्नईमध्ये २१९२.५० रुपये होते.
या वर्षी १ मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रति युनिट ५० रुपये आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३५०.५० रुपये प्रति युनिटने वाढल्या होत्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!