पावसाचं पाणी डोळ्यात गेलं? ‘ही’ चूक ठरू शकते महागडी, काय कराल ते लगेच वाचा!

WhatsApp Group

Eye Infection In Rainy Season : पावसाळा जरी गारवा आणि निसर्गसौंदर्य घेऊन येतो, तरी या ऋतूमध्ये डोळ्यांचे आजार वेगाने वाढताना दिसतात. या दिवसांत वातावरणातील दमटपणा, पाण्यातील जीवाणू आणि विषाणू यामुळे कंजंक्टिव्हायटिस (डोळा येणे), स्टाय (फोड/फुंसी), ड्राय आय सिंड्रोम आणि एलर्जिक कंजंक्टिव्हायटिस यांसारखे आजार सामान्य बनले आहेत.

पावसात डोळ्यांचे आजार का वाढतात?

डॉक्टरांच्या मते, “या ऋतूमध्ये हात स्वच्छ न ठेवणे, पावसाचे पाणी डोळ्यात जाणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे हे प्रमुख कारण ठरतात.” दमट हवामान आणि उष्णतेमुळे डोळ्यांत जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. कार्यालय, शाळा किंवा सार्वजनिक वाहतूक यामधूनही संसर्ग पसरतो.

पावसात होणारे प्रमुख डोळ्यांचे आजार

1. कंजंक्टिव्हायटिस (Eye Flu)

  • लक्षणे: डोळे लाल होणे, पाणी येणे, चिपचिपाट, जळजळ.
  • कारण: विषाणू किंवा जीवाणू संसर्ग.

2. स्टाय (Stye – फोड)

  • लक्षणे: पापणीवर फुंसी, सूज, वेदना.
  • कारण: अशुद्ध हातांनी डोळा चोळणे.

3. ड्राय आय सिंड्रोम

  • लक्षणे: डोळ्यांमध्ये कोरडेपणा, चुभणे, थकवा.
  • कारण: दमट वातावरण, स्क्रीन टाइम जास्त असणे.

4. एलर्जिक कंजंक्टिव्हायटिस

  • लक्षणे: डोळ्यात खाज, पाणी, लालसरपणा.
  • कारण: धूळ, बुरशी, परागकण.

हेही वाचा – डाळ, भाजी आणि इंधन स्वस्त! महागाईने घेतली माघार; जनता खूश!

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी उपाय

  • डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात धुवा.
  • दुसऱ्यांचे रुमाल, टॉवेल, आयड्रॉप्स वापरू नका.
  • पावसाचे पाणी डोळ्यात गेले असल्यास स्वच्छ पाण्याने लगेच धुवा.
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास विशेष काळजी घ्या.
  • कोणताही त्रास जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सांगायचं झालं तर, डोळ्यांशी गाफीलपणा करणे म्हणजे आपल्या आरोग्यावर संकट ओढवून घेणे, त्यामुळे या पावसाळ्यात डोळ्यांशी ‘डोळस’ वागा!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment