

Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलची आजची किंमत पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर आज अपडेट करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी आज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आठ महिन्यांहून अधिक काळ दर स्थिर राहिल्याने आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल २१ मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कपात केली होती.
इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई: पेट्रोलचा दर: १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: ९४.२७ रुपये प्रति लिटर
दिल्ली: पेट्रोलचा दर: ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: ८९.६२ रुपये प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोल: १०२.६३ रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ९४.२४ रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल: १०६.०३ रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ९२.७६ रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल दर: १०१.९४ रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ८७.८९ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – LPG Cylinder Price : होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका..! गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी…
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!