Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलही झाले स्वस्त? वाचा आजचा दर  

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today :  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. ताज्या अपडेटनुसार, आज (मंगळवार) म्हणजेच २ मे रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली आली आहे. त्याच वेळी, WIT क्रूड प्रति बॅरल $ ७५.७१ वर आहे. एकीकडे एप्रिलमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये स्थिरता आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. या महिन्यात म्हणजेच १ मे पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत १९  किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १८५६.५० रुपयांवर गेली आहे.

मात्र, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज २ मे रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

हेही वाचा – LPG Cylinder Price : एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत 

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMS द्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment