

Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील किमती कायम आहेत. काही फरक पडलेला नाही.
कच्च्या तेलाची किंमत देखील प्रति बॅरल $७५ च्या आसपास आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ ७४.८८ वर थोडी वाढ करत आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ ७०.०७ च्या आसपास आहे. कच्च्या तेलाच्या किमतीची खालची पातळी पाहता आगामी काळात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील तेल उत्पादक देशांचा समूह ओपेक कच्च्या तेलाच्या उत्पादनात आणखी कपात करू शकतो.
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे.
हेही वाचा – Horoscope Today: कन्यासह ‘या’ राशींसाठी दिवस शुभ, वाचा मंगळवारचे संपूर्ण राशीभविष्य
दररोज किमती अपडेट केले जातात
कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. यामध्ये पेट्रोल-डिझेलवरील कर, डीलरचे कमिशन आणि वाहतूक खर्च यांचा समावेश आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!