Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल पुन्हा एकदा प्रति बॅरल $ ८५ च्या पुढे गेले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर बहुतांश ठिकाणी डिझेलच्या दराने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
कच्च्या तेलाची किंमत
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून आली. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ ८३च्या जवळ होती, तर आज पुन्हा ब्रेंट तेलाच्या दरात वाढ झाली आहे, ज्याची किंमत प्रति बॅरल $ ८५च्या वर गेली आहे. त्याच वेळी, WTI कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे तर ते प्रति बॅरल $ ७९.२५ आहे.
हेही वाचा – Mahindra Thar : महिंद्राने वाढवल्या थारच्या किंमती..! ग्राहकांना महागाईचा मार; जाणून घ्या!
दिल्ली-मुंबईत पेट्रोलचे दर किती?
देशातील महानगरांबद्दल बोलायचे झाले तर आज (सोमवार) ६ मार्च रोजीही दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!