Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरात तेल स्वस्त की महाग?

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी ७ एप्रिल रोजी जारी केलेल्या नवीन दरांनुसार, शुक्रवारी सलग ३२२ व्या दिवशी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट गेल्या वर्षी २२ मे रोजी झाली होती. केंद्राने २१ मे २०२२ पासून पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली आहे. उत्पादन शुल्कातील या कपातीमुळे एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ९.५० रुपये आणि ७ रुपयांनी कमी झाली आहे.

मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

सध्या दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर शहरात डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे १०२.६३ रुपये आणि ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय बेंगळुरूमध्ये पेट्रोलची किंमत १०१.९४ रुपये आणि डिझेलची किंमत ८७.८९ रुपये प्रति लिटर आहे.

हेही वाचा – IPL 2023 : ना फर्स्ट क्लास मॅच, ना लिस्ट-ए क्रिकेट… RCB ची बँड वाजवणारा सुयश शर्मा कोण?

किंमत दररोज अपडेट केली जाते

स्थानिक कर आकारणीनुसार देशभरातील राज्यानुसार इंधनाचे दर बदलतात. दररोज सकाळी ६ वाजता, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या जसे की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड परकीय चलन दर आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींनुसार इंधनाच्या किमती सुधारतात.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment