Petrol Diesel Price Today : गुजरात-हिमाचलच्या निवडणूक निकालांदरम्यान, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे. मात्र, मंगळवारी तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली. ब्रेंट क्रूड फ्युचर्स प्रति बॅरल $८३.३४ पर्यंत वाढले. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय ७० सेंटने वाढून प्रति बॅरल $ ७७.६३ वर पोहोचला. मात्र जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज सकाळी ६ ला अपडेट केली जाते. आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा सध्याचा दर ९६.७२रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये आहे.

तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती

मुंबई :

पेट्रोल – १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल – ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता:

पेट्रोल – १०६.०३ रुपये, डिझेल – ९४.१० रुपये प्रति लिटर

चंदीगड:

पेट्रोल – ९६.२० रुपये प्रति लिटर, डिझेल – ८४.२६ रुपये प्रति लिटर

भोपाळ:

पेट्रोल – १०८.६५ रुपये प्रति लिटर, डिझेल – ९३.९० रुपये प्रति लिटर

हेही वाचा – Horoscope Today : वृषभ सोबत ‘या’ राशींना आनंदाची बातमी, वाचा आजचे राशीभविष्य 

एका मिनिटात पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही ते घरी बसून करू शकता. पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासण्याचा मार्ग अगदी सोपा आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवरून तुमच्या शहराच्या कोडसह ९२२४९९२२४९ वर संदेश पाठवायचा आहे. तुमच्या शहराचा डीलरशिप कोड इंडियन ऑइलच्या साइटवर उपलब्ध आहे. वेबसाइटवरून संपूर्ण माहिती मिळवू शकता. याशिवाय तेल कंपन्यांच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही माहिती मिळवता येते.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment