Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या नवीन किंमत

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती गेल्या एका आठवड्यापासून प्रति बॅरल $८५ च्या वर आहेत. आज (सोमवार) १० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र यानंतरही बराच काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आज १० एप्रिल रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८५.२२ डॉलर आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $८०.८२ वर आहे. देशातील इतर भागात तेलाच्या किमती काय आहेत ते जाणून घेऊया.

महानगरांमध्ये तेलाची किंमत

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.६३ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हेही वाचा – IPL 2023 : शाहरुख खानने रिंकू सिंहला दिली आपली जागा..! बॅटिंगवर झाला खुश;

तुमच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर तपासा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment