

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव असून तो आता ८० डॉलरच्या खाली घसरला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $७६.१० आणि WTI क्रूडची किंमत $७१.०२ वर आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतील बदलाचा परिणाम भारतात अलीकडच्या काळात दिसला नाही.
सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल झालेला नाही. भाव अजूनही स्थिर आहेत. मात्र, काही शहरांमध्ये वाहतूक आणि अन्य कारणांमुळे पेट्रोल-डिझेलमध्ये फरक दिसून आला आहे.
मोठ्या महानगरांनमधील पेट्रोल डिझेलचे दर
मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९४.२७ रुपये दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४. २४ रुपये प्रति लीटर आहे.
हेही वाचा – Horoscope Today : कर्क सोबत ‘या’ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील, वाचा आजचे…
पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता जारी करतात. यामध्ये सरकारी आणि राज्य कर, शिपिंग खर्च आणि डीलर कमिशन समाविष्ट आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक ९२२३११२२२२ वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price ९२२२२०११२२ वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.