Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर आज १२ मे रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ ७४.७७ आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ ७०.७४ वर आहे. मात्र, त्यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी २२ मे पासून देशात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत अनेक चढ-उतार झाले असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. अशा परिस्थितीत आता तरी या किमती कमी होण्याची शक्यता नाही. जाणून घेऊया देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज (शुक्रवार) एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हेही वाचा – आपण विमानात थर्मामीटर घेऊन प्रवास करू शकतो का? जाणून घ्या काय होईल!

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे जाणून घ्या

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment