Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात घसरण, देशातील ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : भारतात जून २०१७ पासून दररोज, पेट्रोल आणि डिझेलची किंमत सरकारी तेल कंपन्यांकडून जारी केली जाते. वेगवेगळ्या शहरांनुसार ही किंमत ठरवली जाते. आजच्या बद्दल बोलायचे झाले तर, शनिवार, १३ मे २०२३ रोजी देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाला आहे. कुठे भाव वाढले तर कुठे कमी झाले.

कच्च्या तेलाची स्थिती काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑइल दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. ब्रेंट क्रूड तेल १.०८ टक्क्यांनी घसरून $७४.१७प्रति बॅरल आहे. त्याच वेळी, WTI कच्चे तेल प्रति बॅरल $ १.१७ च्या घसरणीसह $ ७०.०४ प्रति बॅरल आहे.

इतर महानगरांमध्ये काय स्थिती आहे?

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

चेन्नई-पेट्रोल १० पैशांनी महागले १०२. ७३ रुपये, डिझेल ९ पैशांनी ९४.३३ रुपये प्रति लिटर

हेही वाचा –Pur Word After Indian City Name : तुम्हाला माहितीये शहर आणि गावांच्या नावांपुढे ‘पूर’ का…

तुमच्या शहरातील इंधनाचे दर असे पहा

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर तपासायचे असतील तर तुम्ही ते घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस करायचा आहे. BPCL ग्राहकांना त्यांच्या शहरातील नवीन दर जाणून घेण्यासाठी ९२२३११२२२२ वर <डीलर कोड> पाठवावा लागेल. दुसरीकडे, इंडियन ऑइलद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. दुसरीकडे, HPCL ग्राहक दर जाणून घेण्यासाठी HPPRICE <डीलर कोड> टाइप करून  ९२२२२०११२२ वर एसएमएस पाठवू शकतात. यानंतर, काही मिनिटांतच तुम्हाला शहरातील नवीनतम दर कळतील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment