Petrol Diesel Price Today : आज तेलाच्या किमतीत किती बदल झालाय? तपासा पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कायम होत्या. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या किमतींनुसार आज दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत १०६.३१ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९४.२७ रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १०२.६३ रुपये आणि ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

हेही वाचा – Signs Of Confident Person : या ५ सवयी माणसाला देतात आत्मविश्वास..! तुम्हीही अवलंबवा

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

भारतात इंधनाचे दर दररोज सकाळी ६ वाजता सुधारले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील आधारभूत किंमत आणि कॅप प्राईसद्वारे नियंत्रित केल्या जातात. यावर डीलर्स आणि ओएमसी एकमेकांशी व्यवहार करतात. केंद्र सरकार उत्पादन शुल्काद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करते.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment