

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil price) सलग दोन दिवस वाढ झाल्यानंतर आज पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ०.४% वाढली आणि प्रति बॅरेक $८१.५७ वर पोहोचली. त्याच वेळी, WTI कच्च्या तेलात ०.३% वाढ होऊन प्रति बॅरॅक $७६.३६ वर पोहोचले आहे. एका आठवड्यात त्याची किंमत ७ टक्क्यांनी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींदरम्यान आजही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. १६डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रति लिटरवर पोहोचला, तर डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटरवर स्थिर राहिला.
पेट्रोल आणि डिझेलचे दर
तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले. पुन्हा एकदा तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांची स्थिती पाहिली तर इथेही तेलाच्या किमती स्थिर आहेत. वाहतूक खर्च आणि इतर कारणांमुळे देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये थोडाफार फरक आहे.
हेही वाचा – Video : टीम इंडियाबाहेर झाल्यानंतर संजू सॅमसनची तुफानी खेळी, ठोकले ७ षटकार; पाहा Video
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
आज दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर इतका आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात १०६.०३ तर डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे.
तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची नवे दर जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही सहज शोधू शकता. तुम्ही एसएमएस पाठवून तुमच्या शहरातील तेलाच्या किमतीची नवीनतम माहिती मिळवू शकता. तुम्हाला फक्त RSP <space> DEALER CODE तुमच्या मोबाईल फोनवरून ९२२४९९२२४९ वर पाठवायचा आहे. थोड्याच वेळात तुम्हाला तेलाच्या नवीनतम किंमती एसएमएसद्वारे मिळतील. याशिवाय इंडियन ऑइल वन अॅप डाऊनलोड करून तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील तेलाच्या किमतींची माहितीही तुम्ही मिळवू शकता.