Petrol Diesel Price Today : घरबसल्या जाणून घ्या देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती  

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. हे नवीन दर तुम्ही दररोज एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. चला तुम्हाला त्याची पद्धत आणि आजचे नवीनतम दर सांगतो.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत असताना, भारताच्या सरकारी तेल कंपन्यांनी आज १७ जानेवारी रोजी नवीन दर अपडेट केले आहेत. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. आजही सर्व महानगरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर सारखेच आहेत.

महानगरांमध्ये तेलाची किंमत

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  देशाची राजधानी दिल्लीत आजही एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे.

हेही वाचा – Shani Gochar Kumbh Rashi 2023 : आजपासून कुंभ राशीत शनिदेव, ‘या’ राशींवर सुरू होणार…

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment