Petrol Diesel Price Today : कच्या तेलाची किंमत ७५ डॉलर, जाणून घ्या देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या किमतीत घट होत आहे. मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रति बॅरल ८६ डॉलरच्या पुढे गेलेले कच्चे तेल आता प्रति बॅरल १० डॉलरपर्यंत घसरत आहे. आज १७ मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ७५.११ डॉलर आहे. यासोबतच दररोज प्रमाणेच देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही अपडेट करण्यात आले आहेत. कच्च्या तेलाचे आणि पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाणून घेऊया.

कच्च्या तेलाची किंमत

आज (१७ मार्च) आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ७५.११ डॉलरवर गेली आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ ६८.७५ वर आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.\

हेही वाचा – MSRTC : महाराष्ट्रातून मोठी बातमी..! आजपासून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत

महानगरांमध्ये तेलाची किंमत

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.६३ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. 

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment