Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढउतार सुरूच आहेत. आज म्हणजेच १७ मे रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता अपडेट करतात. मात्र, जवळपास वर्षभरापासून देशात तेलाच्या किमती स्थिर आहेत. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर शहरानुसार बदलतात. राष्ट्रीय स्तरावर आज (बुधवार), १७ मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७४ डॉलरच्या पुढे गेली आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $ ७४.४९ आहे, जी काल (मंगळवारी) सकाळी ७५.७५ होती. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ ७०.४३ वर आहे, जे काल प्रति बॅरल $ ७१.५८ वर होते. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत.
महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज (बुधवार) एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. मात्र, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बराच काळ कोणताही बदल केलेला नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ ७४ आहे.
हेही वाचा – कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? होऊ शकतो कॅन्सर! धक्कादायक बाब आली समोर!
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.