

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता अपडेट करतात. देशात तेलाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. परंतु राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापूर्वी एकदा नवीन किंमत जाणून घेणे चांगले. राष्ट्रीय स्तरावर आज (मंगळवार) १८ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.
कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७५डॉलरच्या पुढे गेली आहे. आज (१८ जुलै) सकाळी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ ७८.६४ नोंदवली गेली. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $७४.३१ आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
देशाची राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) १८ जुलै रोजीही एक लिटर पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर ८९.६२ रुपये इतका कायम आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
हेही वाचा – कारच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी? जाणून घ्या एअर प्रेशरबाबत!
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्य सरकारे इंधनाच्या किमतींवर त्यांच्या स्वत:च्या नुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!