

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत आणि ब्रेंट क्रूड गेल्या २४ तासांत २ डॉलरने स्वस्त झाले आहे. दोन दिवसांत त्याच्या किमती प्रति बॅरल ४ डॉलरने खाली आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये दर बदलले आहेत.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास $२ कमी होऊन प्रति बॅरल $८०.८९ पर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही घसरून प्रति बॅरल $७७.२९ झाला आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Petrol Price : भारतापेक्षा पाकिस्तानात स्वस्त पेट्रोल मिळतं? ‘या’ देशात दीड रुपयाला…
दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!