

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. बुधवार बद्दल बोलायचे तर २१ डिसेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवली जात आहे. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत १.२० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यानंतर ते प्रति बॅरल $७६.०९ वर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत ०.२३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून ती प्रति बॅरल $८०.१७ वर पोहोचली आहे.
अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Today )दरात काही बदल झाला आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच दरावर आहेत. जाणून घेऊया देशातील इतर शहरांमध्ये १ लिटर पेट्रोल-डिझेल किती आहे-
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Horoscope Today : धनू सोबत ‘या’ राशींना भाग्याची साथ…! वाचा आजचे राशीभविष्य
पेट्रोल-डिझेलच्या दरात बराच काळ बदल झालेला नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, दररोज सकाळी ६ वाजता, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या देशातील प्रमुख तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करतात. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल २१मे रोजी झाला होता. सर्वसामान्यांची महागडी पेट्रोल-डिझेलच्या दरातून सुटका करण्यासाठी सरकारने पेट्रोलचे दर प्रतिलिटर आठ रुपये आणि डिझेलच्या दरात सहा रुपयांनी कपात केली होती. तेव्हापासून देशात त्याच्या किमती जवळपास स्थिर आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही एसएमएसद्वारे पाहू शकता. यासाठी, HPCL ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत तपासण्यासाठी ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवावा. यानंतर कंपनी या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती एसएमएसद्वारे पाठवेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!