Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करतात. मात्र, देशात तेलाच्या किमती दीर्घकाळ स्थिर आहेत. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये तेलाच्या किमती बदलतात.
अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे आहे
राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई, श्रीगंगानगर आणि भोपाळमध्ये १०० रुपयांच्या पुढे पेट्रोलची विक्री होत आहे. iocl नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये आहे. मे २०२२ पासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर अपरिवर्तित आहेत. जाणून घेऊया आजचे दर.
हेही वाचा – Business Idea : सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिजनेस; होईल लाखोंची कमाई!
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. तथापि, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बराच काळ कोणताही बदल केलेला नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $७५ च्या खाली आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!