Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत तेल कंपन्यांकडून दिलासा सुरूच आहे. बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्याचा हा ११वा महिना आहे.
कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीवरून किरकोळ वाढल्या. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ ८१.६६ आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ ७७.८७ आहे. यापूर्वी, कच्च्या तेलात प्रति बॅरल $ ८५ या वरच्या पातळीवरून घसरण झाली होती.
मोठ्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Akshay Tritiya 2023 : तब्बल 125 वर्षानंतर पंचग्रही योग..! ‘या’ 5 राशीचे लोक ठरतील…
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे पाहू शकता. इंडियन ऑइलचे (IOC) ग्राहक ९२२४९९२२४९ वर RSP<डीलर कोड> एसएमएस पाठवतात. पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्यासाठी, BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर एसएमएस करू शकतात. HPCL ग्राहक ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!