Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले ? वाचा पेट्रोल-डिझेलच्या किमती 

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि त्याचा देशातील इंधनाच्या किमतीवर कसा परिणाम होत आहे हे जाणून घेण्यासाठी आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेतले पाहिजेत. दररोज सकाळी ६ वाजता, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या देशातील प्रमुख तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. भारतात पेट्रोल डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे आणि या आधारावर ब्रेंट क्रूडचा दर ८२ डॉलरच्या पुढे गेला आहे. आज जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ ८२.५४ च्या दराने आहे. डब्ल्यूटीआय क्रूड देखील प्रति बॅरल $८० च्या जवळ आहे आणि त्याचा दर प्रति बॅरल $७८.७१ वर आला आहे.

आज महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

देशाची राजधानी दिल्लीसह चार प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ते कालच्या दरांवर स्थिर आहेत.

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशीच्या लोकांच्या समस्या वाढतील…! जाणून घ्या आजचे…

घरी बसून पेट्रोल डिझेलचे दर कसे तपासायचे

पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्याही जाणून घेऊ शकता. यासाठी HPCL ग्राहकांनी ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवावा. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवावा. यानंतर कंपनी या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती एसएमएसद्वारे पाठवेल.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment