Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर ‘या’ शहरांमध्ये बदलले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्या देशात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर या किमती ठरवल्या जातात. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली जात आहे. आज, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये १.२१ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली जात आहे आणि ते प्रति बॅरल $ ८३.०५ वर व्यापार करत आहे. दुसरीकडे, WTI कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार केला तर त्याची किंमत ०.२४ टक्क्यांनी कमी झाली आहे आणि ती प्रति बॅरल $ ७६.१६ वर व्यापार करत आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यानंतर आज देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही शहरांमध्ये ते महागही झाले आहे.

इतर मेट्रो शहरांचे इंधन दर जाणून घ्या-

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

हेही वाचा – Bank Holidays : मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद..! सर्व कामं उरकून घ्या; वाचा सुट्ट्यांची यादी

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेच तपासा-

भारतातील तेल कंपन्या त्यांच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे इंधनाचे दर तपासण्याची सुविधा देतात. जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत देखील जाणून घ्यायची असेल, तर HPCL ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्यासाठी ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही BPCL चे ग्राहक असाल, तर किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवा. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना त्यांच्या शहराची नवीन किंमत तपासायची असेल, तर RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवा. यानंतर, तेल कंपनी काही मिनिटांत तुमच्या मोबाइलवर त्या शहरासाठी नवीन किंमतीचा संदेश पाठवेल. अशा प्रकारे तुम्ही घरी बसून नवीन किंमत तपासू शकाल.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment