Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांच्या ताज्या अपडेटनुसार, आज म्हणजेच २२ मार्चलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा घट होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत तेलाचे दर स्थिर राहू शकतात. आज कच्च्या तेलाच्या किमतींबाबत काय अपडेट आहे ते जाणून घेऊया.
कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात आज (बुधवार) २२ मार्च रोजी ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ७४.८७ डॉलर आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ ६९.३३ वर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दरांमध्ये घट दिसून येत आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा – Gold Silver Price Today : गुढीपाडव्याला सोनं झालं स्वस्त..! वाचा आजचा दर
महानगरांमध्ये तेलाची किंमत
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.६३ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!