Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज (२३ मे २०२३, मंगळवार) WTI कच्च्या तेलाच्या किमतीत ०.६१ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्याच वेळी, ब्रँड कच्चे तेल ०.२६ टक्क्यांनी वाढून $७६.१९ प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. दरम्यान, देशात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम) वाहनांच्या इंधनाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. ही परिस्थिती गेल्या १० महिन्यांहून अधिक काळापासून सुरू आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. दुसरीकडे, दिल्लीत डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३५ रुपये प्रति लिटर असेल, तर एक लिटर डिझेल ९४.२७ रुपयांना मिळेल. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्येही तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी १०२.६३ रुपये मोजावे लागतील, तर डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे.
हेही वाचा – Car AC : कारचा एसी मे-जूनमध्येच का खराब होतो? मायलेज का मिळत नाही? नक्की वाचा!
अशा प्रकारे जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाची किंमत
पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकाला RSP लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावे लागेल. दुसरीकडे, BPCL ग्राहकांना RSP ९२२३११२२२२ वर पाठवावा लागेल, तर HPCL ग्राहकांना HPPRICE ९२२२२०११२२ वर पाठवावा लागेल, त्यानंतर इंधनाच्या किमतीची माहिती मिळू शकेल.