

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी आज, २६ एप्रिलसाठीही पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले आहेत. सर्व महानगरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर सारखेच आहेत. २१ मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या नवीन अपडेटनुसार, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.
हेही वाचा – तरुणांना पार्टी, मजा करण्यासाठी सरकार देतं महिन्याला 40,000 रुपये! कारण आहे गंभीर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!