Petrol-Diesel Price Today : कच्या तेलाच्या किमतीत घसरण, वाचा तुमच्या शहरातील दर 

WhatsApp Group

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही भारतीय बाजारात तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी तेलाच्या किमतीत बदल झाले असले तरी देशातील चार महानगरांमध्ये ६ महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

विशेष म्हणजे देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोलच्या दरात शेवटचा बदल २२ मे रोजी झाला होता. इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सहा महिन्यांत बदलले नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात आणि त्यानंतर नवीन दर जारी करतात. सरकारी तेल कंपनी IOCL ने आजचे नवीन दर जारी केले आहेत. 

हेही वाचा – Horoscope Today : सिंह सोबत ‘या’ राशीच्या लोकांना नोकरीत चांगल्या संधी, वाचा रोजचे…

महानगरांमध्ये १ लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत

>> दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

>> मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

>> चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या एका क्लिकवर 

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. 

Leave a comment