

Petrol Diesel Price Today : दररोजप्रमाणेच सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आज भारतातील अनेक शहरांमध्ये इंधन दरात बदल झाला आहे. त्यात एका मेट्रो सिटीच्या नावाचाही समावेश आहे. चेन्नईमध्ये आज पेट्रोल १४ पैशांनी महागले 102.77 रुपये आणि डिझेल 13 पैशांनी महागले 94.37 रुपये आहे. दुसरीकडे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या अन्य तीन महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.
कच्च्या तेलाची स्थिती काय आहे?
मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. WTI क्रूड ऑइल आज 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल $ 80.07 वर आहे. दुसरीकडे, जर आपण ब्रेंट क्रूड ऑइलबद्दल पाहिलं तर आज ते 0.04 टक्क्यांनी कमी होत आहे आणि ते प्रति बॅरल $ 84.39 वर व्यापार करत आहे.
हेही वाचा – किआच्या ‘या’ परवडणाऱ्या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ! किमंत किती? जाणून घ्या!
या शहरांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर बदलले (Petrol Diesel Price Today)
पुणे – पेट्रोल 94 पैशांनी स्वस्त होत 105.91 रुपये तर डिझेल 93 पैशांनी स्वस्त होत 92.43 रुपये झाले आहे.
नोएडा – पेट्रोल 33 पैशांनी महागले किंमत- 96.92 रुपये, डिझेलच्या दारत 32 पैशांनी वाढ होत 90.08 रुपये प्रति लिटर.
तुमच्या शहराचे इंधन दर याप्रमाणे तपासा-
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घ्यायची असेल, तर HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. दुसरीकडे, इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. BPCL च्या ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवा. काही मिनिटांत तुम्हाला कंपनीकडून शहरातील इंधन दरांची नवीन माहिती मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!