

Petrol Diesel Price Today : दिल्ली ते उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ते राजस्थान या राष्ट्रीय बाजारपेठेत आज (रविवार) ६ नोव्हेंबर रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, दिल्लीपेक्षा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.
यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये आहे. तर राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.६५ रुपये आणि डिझेल ९८.३९ रुपये आहे. याशिवाय जैसलमेरमध्ये पेट्रोल ११०.७१ रुपये आणि डिझेल ९५.७४ रुपये प्रति लिटर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलचा दर १०८.६५ रुपये आणि डिझेलचा दर ९३.९० रुपये प्रतिलिटर आहे.
हेही वाचा – SA Vs NED : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स..! नेदरलँड्सनं हरवलं; पाकिस्तानची चांदी!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलच्या किमतीत चढ-उतार होत असताना २१ मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर ८४.१० रुपये प्रतिलिटर आहे, तर डिझेलचा दर ७९.७४ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचवेळी बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०६.३१ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.