Petrol Diesel Price Today in Marathi: दिवाळीचा महिना सुरू, किती झालंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या आजचा दर!

WhatsApp Group

Today’s Petrol Diesel Price in Marathi : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच 01 नोव्हेंबर 2023, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, राज्यांमध्ये किरकोळ बदल दिसून येत आहेत. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. दिल्ली, मुंबईपासून बिहारपर्यंत विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर किती ? (Petrol Diesel Rate Today)

IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत आजही एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर कायम आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी जे व्हायचं ते झालंच! गॅस सिलिंडरचे दर ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे कशी तपासायची

राज्य सरकारे इंधनाच्या किमतींवर स्वतःचा व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

दररोज सकाळी नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment