Free Ration : फ्री रेशन घेणार्‍यांसाठी खुशखबर..! सरकार आज करणार ‘मोठी’ घोषणा?

WhatsApp Group

Modi Govt On Free Ration Scheme : तुम्हीही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) मोफत रेशन घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते, की सरकारकडे पुरेसे धान्य नाही, त्यामुळे डिसेंबरनंतर सरकार या योजनेंतर्गत देण्यात येणारी सुविधा बंद करू शकते. पण आता अशी बातमी आहे की डिसेंबरनंतरही पंतप्रधान मोदी गरिबांना मोफत रेशन देणार्‍या PMGKAY योजनेचा विस्तार करण्याचा विचार करतील.

आज मंत्रीमंडळाची बैठक

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी ही माहिती देताना सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा असल्याचे प्रतिपादन केले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) पुढे नेल्यास, हा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ घेईल. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. रेशन योजना पुढे नेण्यासह अनेक निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतात. सप्टेंबरमध्ये रेशन योजनेची अंतिम मुदत सरकारने तीन महिन्यांसाठी म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली होती.

हेही वाचा – कॅन्सर, डायबेटिसच्या गोळ्या झाल्या स्वस्त..! पॅरासिटामॉलही ‘एवढ्या’ रुपयात मिळणार; वाचा नवे दर!

मोफत रेशन वितरणावर १.८० लाख कोटी खर्च

कृषी राज्यमंत्री करंदलाजे म्हणाले, ”कोविड-१९ ची प्रकरणे येत आहेत. ही योजना डिसेंबरपर्यंत आहे. तो पुढे नेण्याबाबत पंतप्रधान निर्णय घेतील. ते म्हणाले की, गेल्या २८ महिन्यांत सरकारने PMGKAY अंतर्गत गरीबांना मोफत रेशन वितरणावर १.८० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकारकडे अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा अन्नधान्य साठा आहे.”

मंत्री पुढे म्हणाले, ”उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दुष्काळ आणि हवामान बदलाचा पिकावर काही परिणाम झाल्यामुळे तांदूळ आणि गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, ही धारणा योग्य नाही. गेल्या आठवड्यात, अन्न मंत्रालयाने सांगितले होते की १ जानेवारी २०२३ पर्यंत सुमारे १५९ लाख टन गहू आणि १०४ लाख टन तांदूळ उपलब्ध होईल, तर १ जानेवारीच्या बफर नॉर्मनुसार, १३८ लाख टन गहू आणि ७६ लाख टन तांदूळ आवश्यक आहे. १५ डिसेंबरपर्यंत केंद्रीय पूलमध्ये सुमारे १८० लाख टन गहू आणि १११ लाख टन तांदूळ उपलब्ध होता.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment