कंपनीचं औषध 40 वेळा फेल झालंय… तरी पण तीच कंपनी पुन्हा टेंडर जिंकते, कसल्या जोरावर?

WhatsApp Group

Rajasthan Medicine Scam : राजस्थान सरकारकडून मोफत वाटली जाणारी औषधे आता मृत्यूचे कारण ठरत आहेत. ‘केसॉन’ नावाच्या एका औषध निर्माता कंपनीचा कफ सिरप प्याल्यानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, आणि अनेक मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बाब एवढ्यावरच थांबत नाही… कारण, हीच केसॉन कंपनी गेल्या दोन वर्षांत तब्बल 40 वेळा औषध चाचणीत नापास झाली आहे. एवढं असूनही, सरकारचं RMSCL (Rajasthan Medical Services Corporation Limited) आणि ड्रग कंट्रोल विभाग या कंपनीकडून पुन्हा औषधे खरेदी करत असल्याने मोठा घोटाळा उघडकीस येतो आहे.

ब्लॅकलिस्ट असूनही पुन्हा टेंडर जिंकणारी कंपनी?

2020 पासून अजमेर, भरतपूर, जयपूर, जोधपूर, सीकर, भीलवाडा, बांसवाडा अशा जिल्ह्यांमध्ये या कंपनीचे सॅम्पल फेल झालेले आहेत. त्यानंतर कंपनीला ब्लॅकलिस्टही करण्यात आले. पण तरीही, केसॉन कंपनी काही खासगी लॅब्सशी संगनमत करून आपली दवा ‘फिट’ असल्याचे सर्टिफिकेट मिळवते आणि पुन्हा सरकारी टेंडर जिंकते.

सरकारी लॅब असूनही खासगी लॅबवर अवलंबून का?

राजस्थानमध्ये सरकारी औषध तपासणी प्रयोगशाळा अस्तित्वात असताना, RMSCL मात्र खासगी लॅब्सच्या रिपोर्टवर अवलंबून आहे. यासाठी निवडक खासगी लॅब्सची पॅनलिंग केली जाते आणि त्यांच्यामार्फत चुकीची माहिती देऊन जनतेच्या जीवाशी खेळ केला जातो.

‘फ्री मेडिसिन स्कीम’मधूनच पुरवली जातात ‘अयोग्य’ औषधे

‘मुख्यमंत्री निःशुल्क औषध योजना’ (MNDY) ही 2 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू करण्यात आली होती. सामान्य नागरिकांना मोफत आणि दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी ही योजना सुरू झाली. मात्र गेल्या काही वर्षांत या योजनेअंतर्गत वाटल्या गेलेल्या 915 औषधांचे सॅम्पल फेल झाले आहेत.

  • 2024 मध्ये 101 सॅम्पल फेल
  • 2025 मध्ये (आतापर्यंत) 81 सॅम्पल फेल
  • कोरोना काळात सर्वाधिक सॅम्पल फेल

जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई कधी?

या प्रकरणात सरकार, RMSCL अधिकारी आणि औषध कंपन्यांमधील संगनमत उघड झाले आहे. दोन बालकांचा मृत्यू आणि शेकडो रुग्णांची तब्येत बिघडणे ही कुठल्याही प्रशासकीय गलथानपणाचे मोठे उदाहरण आहे. लोकांचे जीव धोक्यात घालून, औषध विक्रीचे राजकारण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment