

Medicine With Milk Or Tea : आपण अनेकदा गोळ्या किंवा कॅप्सूल दूध किंवा चहा सोबत घेतो. परंतु विज्ञान काय सांगतं? तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट औषधं दूध किंवा चहा सोबत घेतल्यास त्यांचा परिणाम पूर्णपणे कमी होऊ शकतो. विशेषतः दुधात असलेले कॅल्शियम, प्रोटीन, फॅट आणि मॅग्नेशियम काही औषधांशी रासायनिक प्रतिक्रिया करतात.
दूध + औषध = धोका?
- टेट्रासायक्लिन, सिप्रोफ्लॉक्सासिनसारख्या अँटीबायोटिक्स दूधासोबत घेतल्यास त्यांची प्रभावीता 50-80% पर्यंत घटते.
- कॅल्शियम हे घटक औषधांशी बाँड तयार करतात आणि शरीरात त्यांचं शोषण थांबवतं.
- केटोकोनाझोलसारख्या अँटीफंगल औषधांना ऍसिडिक वातावरण हवं असतं, जे दूधामुळे बिघडतं.
- थायरॉइड आणि आयर्न सप्लिमेंट्स सुद्धा दूधासोबत घेतल्यास परिणाम होत नाही.
दूधासोबत घेतली जाऊ शकणारी औषधं
- पॅरासिटामॉलसारखे पेनकिलर्स
- कॅल्शियम / व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स
- काही अँटासिड्स
एलर्जीक गोळ्या जसं की Allegra
दूधासोबत घेतल्यास थेट नुकसान नाही, परंतु दुधातील फॅट व कॅल्शियम शोषणाला संथ करतात. म्हणजेच गोळी उशिरा काम करेल. त्यामुळे आदर्श पद्धती नक्कीच नाही.
हेही वाचा – VIDEO : सिराजनं जिंकून दिला सामना, पण ख्रिस वोक्सनं जिंकली मनं!
चहा + औषध = अजिबात नको!
चहा (काळा, ग्रीन टी किंवा हर्बल) यामध्ये कॅफीन, टॅनिन्स असतात जे औषधांच्या अॅब्सॉर्प्शनमध्ये अडथळा निर्माण करतात. विशेषतः:
- आयर्न सप्लिमेंट्ससाठी चहा घातक
- स्नायू सैल करणाऱ्या औषधांवर परिणाम
- हृदयविकार आणि डायबेटिसच्या औषधांवर प्रतिक्रिया
तज्ञांचा सल्ला
- दूध किंवा चहा न घेता साध्या पाण्याने औषध घ्या
- डॉक्टरांनी सांगितले तरच दूध किंवा दुधातील पदार्थासोबत औषध घ्या
- औषध घेतल्यावर लगेच चहा किंवा दूध टाळा
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!