

Period Pain Relief : मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना, अस्वस्थता आणि चिडचिड हे अनेक महिलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. काहीजणी यावर गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करतात, तर काहीजणी चॉकलेट किंवा कॉफीमधून आराम शोधतात. काही वेळा मात्र वेदना इतक्या असह्य होतात की औषधाशिवाय पर्याय राहत नाही.
पण अलीकडे सेक्सुअल हेल्थ एज्युकेटर डॉ. तनया नरेंद्र यांनी एका पॉडकास्टमध्ये एक आगळंवेगळं विधान केलं, “शिव्या देणं म्हणजे केवळ राग व्यक्त करणं नाही, तर वेदना कमी करण्याचं एक उपायसुद्धा असू शकतो.”
शिव्या देणं का करतंय मदत?
The Indian Express मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, डॉ. नरेंद्र यांनी स्पष्ट केलं की शिव्या देणं ही केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नाही, तर ती मनाला आणि शरीराला तात्पुरती विश्रांती देणारी क्रिया आहे. 2009 मधील एका संशोधनात असं आढळलं की, ज्यांना शिव्या देण्याची परवानगी दिली गेली, त्यांनी इतरांपेक्षा 30 सेकंद अधिक काळ बर्फात हात ठेवून वेदना सहन केल्या.
शिव्या देताना शरीरात अॅड्रेनालिन आणि एंडॉर्फिन हे नैसर्गिक पेनकिलर्स रिलीज होतात, जे शरीरातील वेदना थोडक्याच वेळात कमी करतात. लिम्बिक सिस्टीम, जो मेंदूचा इमोशनल भाग आहे, तो सक्रिय होतो आणि मानसिक-शारीरिक तणाव कमी करतो.
“गाली दो… आणि चॉकलेट खा!”
पॉडकास्टमध्ये डॉ. तनया यांनी थोडक्या विनोदी शैलीत सांगितलं, “गाली दो यार मस्त, चॉकलेट खाओ. आणि पार्टनर चॉकलेट न लाए, तो उसे शिव्या दो!” त्यांचा अंदाज जरी हलकाफुलका होता, तरी त्यामागे वैज्ञानिक आधार आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 ट्रॉफी वाद : “मी स्टेजवर कार्टूनसारखा उभा होतो…”, PCB प्रमुख मोहसिन नकवींचा थयथयाट!
मानसशास्त्र काय सांगतं?
Mindtalk च्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नेहा पराशर यांचं म्हणणं आहे की, शिव्या देणं हे भावनात्मक कॅथार्सिस म्हणजेच भावनांचा विस्फोट असतो. यामुळे व्यक्तीला मानसिक हलकं वाटतं आणि वेदनेचं प्रमाणही कमी भासतं. तरीदेखील, हे कोणत्याही औषधाच्या उपचाराचं पर्याय नाही. जर पाळीतील वेदना दर महिन्याला असह्य होत असतील, तर गाइनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
इतर नैसर्गिक उपाय
नेहा पराशर यांच्या मते, पाळीतील वेदना कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय हे अधिक फायदेशीर ठरतात:
- हलकं व्यायाम किंवा योगासन
- भरपूर पाणी पिणं
- आयरन आणि मॅग्नेशियमयुक्त आहार
- नीट झोप
- गरम पाण्याने पोटाची शेक
- ध्यान आणि डीप ब्रीदिंग
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा