प्रेग्नेंसी टेस्ट नेगेटिव्ह, तरीही बाळाला दिला जन्म! काय आहे ही ‘Secret Pregnancy’?

WhatsApp Group

Secret Pregnancy : प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा हा एक खास अनुभव असतो. पण विचार करा, एखादी महिला गर्भवती असते आणि तिला याचा पत्ताही लागत नाही! हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जगभरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे महिलांना गर्भवती असल्याचं उशिरा किंवा प्रसुतीच्या वेळेपर्यंतही कळत नाही. अशा अवस्थेला “सीक्रेट प्रेग्नेंसी” किंवा “क्रिप्टिक प्रेग्नेंसी” असं म्हणतात.

सीक्रेट प्रेग्नेंसी म्हणजे काय?

सामान्यतः महिलांना गर्भधारणा झाल्यावर 4 ते 12 आठवड्यांत त्याची जाणीव होते. मात्र, सीक्रेट प्रेग्नेंसीमध्ये महिलेला स्वतः गर्भवती असल्याची जाणीव होत नाही. कधी कधी प्रसुती वेदना सुरू होईपर्यंत तिला याचा पत्ता लागत नाही.

ह्या अवस्थेत गर्भधारणेची सामान्य लक्षणं जसं की मासिक पाळी थांबणं, पोट वाढणं, उलट्या होणं किंवा प्रेग्नेंसी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येणं – ही लक्षणं कमी प्रमाणात दिसतात, अगदी दुर्लक्ष केली जाऊ शकतात किंवा काही वेळा ती दिसतच नाहीत.

क्रिप्टिक प्रेग्नेंसीचे कारण काय असू शकते?

  1. पीसीओडी किंवा पीसीओएस (PCOD/PCOS):
    या आजारामुळे मासिक पाळी नियमित होत नाही. त्यामुळे महिला ही समस्या सामान्य समजून दुर्लक्ष करतात.
  2. HCG हार्मोनची कमी पातळी:
    HCG (Human Chorionic Gonadotropin) हा हार्मोन गर्भधारणेचे निदान करण्यासाठी वापरला जातो. जर त्याची पातळी कमी असेल, तर प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते, ज्यामुळे महिलेला समजतच नाही की ती गर्भवती आहे.
  3. 40 नंतरचा वयात बदल:
    काही महिलांना वयाच्या चाळिशीनंतर मेनोपॉजची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे त्या गोंधळात पडतात की या वयात गर्भधारणा शक्यच नाही, पण प्रत्यक्षात गर्भधारणा झालेली असते.

सीक्रेट प्रेग्नेंसीपासून सावध राहण्यासाठी काय करावे?

  • मासिक पाळी अनियमित असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे
  • शरीरातील लहान-मोठे बदल दुर्लक्ष न करणे
  • गर्भधारणेची शक्यता असेल तर डॉक्टरांकडून सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी करून खात्री करणे

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment