

White Hair Home Remedies : साधारणपणे एका वयानंतर केस पांढरे होण्याची समस्या सुरू होते, परंतु आजकाल ही समस्या तरुण वयातच दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हल्लीच्या तरुणांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. लहान वयात केस पांढरे होणं हे तणावाचं मोठं कारण बनतं. जेव्हा २५ ते ३० या वयात पहिल्यांदा पांढरे केस दिसतात तेव्हा तरुणांना खूप तणाव येतो. यासाठी अनेक जण हेअर डाय किंवा बाजारातील महागडी उत्पादनं वापरतात पण त्यांचा परिणाम काही दिवसांसाठीच असतो. तुम्ही घरात असलेल्या गोष्टींद्वारे पांढरे केस नैसर्गिक पद्धतीनं काळे करू शकता.
लहान वयात केस पांढरे का होतात ?
अकाली पांढऱ्या केसांमुळं हल्लीचे तरुण खूप अस्वस्थ असतात, ह्या गोष्टीमुळं त्यांना अनेकदा कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यस्त जीवनशैली, कामाचा ताण, तणाव आणि हार्मोनल बदल ही केस पांढरे होण्याची प्रमुख कारणं आहेत. मात्र, या समस्येवर वेळीच मात करता येते. बरेच घरगुती उपाय करुन तुम्ही केस पांढरे होण्यापासून सुटका मिळवू शकता.
केस काळे करण्यासाठी या तीन घरगुती गोष्टींचा वापर करा
मेथी दाणे
निरोगी, मजबूत आणि सुंदर काळे केस मिळविण्यासाठी मेथीदाण्यांचा वापर आवश्य करावा. यामध्ये असलेले पोषक तत्व केस काळे होण्यास मदत करतात. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवून ती खोबरेल किंवा बदामाच्या तेलामध्ये मिसळून लावा.
हेही वाचा – International Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे उगाच साजरा नाही करत! त्यालाही एक इतिहास आहे…
मेहंदी
केस काळे करण्यासाठी केमिकल हेअर डाईचा वापर टाळा त्यामुळं बरंच नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही मेहंदी वापरा कारण मेहंदी हा एक नैसर्गिक उपाय आहे आणि त्यामुळं कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मेहंदी पावडर पाण्यात भिजत ठेवा, नंतर त्यात चहाचं पाणी आणि लिंबाचा रस घालून केसांना लावा. केस अगदी मुलायम होतात.
आवळा
आवळा हा केसांसाठीचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. आवळा केस काळे होण्यास मदत करतोच पण ते खूप मजबूत बनवतो. आवळा दोन प्रकारे वापरता येतो. तुम्ही ते मुरब्बाच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा मेहंदीमध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांवर लावू शकता. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतात .
कांदा
केसांची मजबुती आणि केसांच्या वाढीसाठी कांदा एक प्रभावी औषध मानला जातो, त्यात असलेले सल्फर केस गळण्याच्या समस्येपासून मुक्तता देते. बरेच लोक कांदयाला पांढर्या केसांवरचा उपाय समजतात.