एखाद्याला फोन केल्यावर पहिल्यांदा ‘हॅलो’च का बोललं जातं?

WhatsApp Group

मुंबई : हॅलो कोण बोलतंय…हॅलो कैसे हो…हॅलो हाऊ आर यू? भाषा बदलल्या तरी फोनवर माणसाच्या तोंडातून पहिला पहिला शब्द ‘हॅलो’ हा शब्द बाहेर पडतो. तसा हा शब्द फार सामान्य आहे. दैनंदिन जीवनात आपण हा शब्द किती वेळा वापरतो. कोणाला फोन करायचा असेल किंवा कोणाचा फोन आला तर आप सर्वप्रथम हॅलोच म्हणतो. जगभरात भाषा वेगळी असली तरी फोनवर बोलताना पहिल्यांदा हाच शब्द वापरला जातो. मात्र, फोन केल्यावर आपण पहिल्यांदाच ‘हॅलो’च का म्हणतो? इतर शब्द का नाही वापरले जात? यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हॅलो हो इंग्रजी शब्द आहे. मुळ जर्मन शब्द ‘होला’पासून याची निर्मिती झाली आहे. ‘होला’चा अर्थ होता कसे आहात? काळानुसार या शब्दामध्ये बदल झाला आणि ‘होला’चे झाले ‘हॅलो.

हा शब्द प्रथम कुणी वापरला?

महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी २ जून १८८५ रोजी टेलिफोनचा शोध लावला. काही अहवालांच्या मते अलेक्झांडर यांनी पहिला फोन त्यांच्या प्रेयसीला केला होता. त्यांच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हॅलो होते. फोन केल्यानंतर त्यांनी तिचं नाव घेतलं. त्यानंतर फोन केल्यानंतर हॅलो शब्द वापरायची पद्धत सुरु झाली. परंतु काही अहवालांनुसार ग्राहम बेल आणि मार्गारेट हॅलो यांची ही कथा खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार ग्राहम यांची प्रियसी मेबेल हॉर्वड होती. तिच्यासोबत ग्राहम यांनी लग्न केलं.

एडिसननं लावला हॅलोचा शोध?

आता जर बेल यांनी हॅलो शब्दाचा शोध लावला नाही, तर कुणी लावला हा प्रश्न समोर येतो. अमेरीकन टेलिग्राफ आणि टेलिफोन कंपनीच्या अहवालानुसार हॅलो शब्दाचा शोध लावण्याचं श्रेय अमेरीकेचे शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना जातं. सन १८३३ मध्ये हा शब्द पहिल्यांदा लिहिला गेला आणि सन १८४४ मध्ये हॅलो हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. त्याअगोदर वास्तविक दुरध्वनीवर संभाषण सुरु करण्यापूर्वी ‘आर यू देअऱ’ किंवा ‘आर यू रेडी टू टॉक’ म्हणजे तुम्ही तिथे आहात का? आणि तुम्ही बोलण्यास तयार आहात का? अशी वाक्यं बोलली जात होती. मात्र, थॉमस एडिसन यांना एवढी लांबलचक वाक्यं आवडली नाहीत आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्यांच्या तोंडून चूकून ‘हॅलो’ शब्द निघाला आणि नंतर तोच शब्द सगळीकडं वापरला जाऊ लागला.

Leave a comment