

Female Fertility Decline : 21व्या शतकातही “बाळ होत नाही” असं बोलणं महिलांसाठी आजही लाजिरवाणं मानलं जातं. पण वास्तविकता अशी आहे की, महिलांमध्ये फर्टिलिटी- म्हणजेच नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्याची क्षमता झपाट्याने कमी होत चालली आहे. WHO च्या अहवालानुसार, जगभरात 18.6 कोटी लोक वंध्यत्वाचा सामना करत आहेत. भारतातही प्रायमरी इनफर्टिलिटी रेट 3.9% ते 16.8% दरम्यान आहे. काश्मीर, आंध्र प्रदेश आणि केरळसारख्या राज्यांमध्ये ही टक्केवारी आणखी जास्त आहे.
उशिरा लग्न आणि मातृत्व टाळल्याने अंडाणूंची गुणवत्ता घटते
- आजच्या स्त्रिया करिअर, शिक्षण, स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्याला महत्त्व देतात — आणि हे योग्यही आहे.
- पण वैद्यकीय अभ्यास सांगतो की, 35 वर्षांनंतर अंडाणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही घटतात.
- डॉ. रीमा सिरकार, क्लिनिकल डायरेक्टर (इंदिरा IVF, देहरादून) यांच्या मते, “35 नंतर प्रेग्नंसीची शक्यता 25% नी घटते, तर 40 नंतर ही शक्यता केवळ 5 ते 10% राहते.”
हार्मोनल असंतुलन आणि धावपळीचं जीवन
- PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), थायरॉईड, अनियमित पाळी आणि स्थूलता यामुळे फर्टिलिटीवर परिणाम होतो.
- जंक फूड, कमी झोप, तणाव, आणि स्क्रीन टाइममुळे हार्मोन्सचा समतोल बिघडतो.
- जर BMI (बॉडी मास इंडेक्स) 25 पेक्षा अधिक किंवा 19 पेक्षा कमी असेल, तर गर्भधारणेची शक्यता घटते.
IVF, मानसिक आरोग्य आणि तणावाचं दुष्टचक्र
- IVF उपचार घेणाऱ्या अनेक महिलांना तीव्र तणाव, नैराश्य आणि झोपेच्या समस्या जाणवतात.
- एका संशोधनात दिसून आलं की, ज्या महिलांमध्ये Resilience (मानसिक लवचिकता) जास्त असते, त्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरतात.
- IVF अपयशी ठल्यास मानसिक धक्का अधिक गंभीर असतो.
“बाळ कधी होणार?” — सामाजिक दबाव आणि मानसिक थकवा
- लग्न झाल्यानंतर महिलांवर समाजाकडून सतत एकच प्रश्न: “बाळ कधी होणार?”
- या प्रश्नामुळे मानसिक थकवा वाढतो.
- अभ्यासानुसार, ज्या महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक आधार मिळतो, त्यांच्यात नैराश्याची शक्यता 25% नी कमी होते.
चुकीची समजूत: वंध्यत्व फक्त महिलांचेच?
- अनेकांना वाटतं की वंध्यत्व ही फक्त महिलांचीच समस्या आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे.
- संशोधन सांगतं की 30 ते 50% वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांचाही मोठा वाटा असतो.
महिलांनी फर्टिलिटीसाठी कोणती काळजी घ्यावी?
- 30 नंतर फर्टिलिटी चाचण्या वेळोवेळी करून घ्या.
- पीरियड्स अनियमित, PCOS किंवा थायरॉईडसारख्या त्रासांची लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव टाळणं अत्यावश्यक.
- IVF, Egg Freezing, Ovulation Tracking यांसारख्या पर्यायांची वेळेवर माहिती घेणं म्हणजे योग्य नियोजन – घाई नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!