

Guinness World Record For The Longest Dreadlocks : जगातील अद्वितीय असलेल्या प्रत्येक प्रतिभेचे किंवा चमत्कारांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाते. अलीकडंच एका महिलेचे नाव तिच्या लांब केसांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला गेल्या ४० वर्षांपासून आपल्या केसांना वाढवत आहे आणि तिनं ४० वर्षांपासून एकदाही केस कापले नाहीत. ही महिला कोण आहे? ४० वर्षात या महिलेच्या केसांचे वजन किती झालं? ती केसांची निगा कशी ठेवते? जाणून घ्या..
कोण आहे ही महिला?
४० वर्षांपासून केस वाढवणाऱ्या महिलेचे नाव आशा मंडेला असून त्या मूळच्या फ्लोरिडा येथील क्लेरेमॉन्ट येथील आहेत. त्यांचं वय ६० वर्षे आहे. आशा मंडेला यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, “मी माझ्या केसांना माझा शाही मुकुट मानते.” गिनीज वेबसाइटनुसार, २००९ मध्ये सर्वात लांब ड्रेडलॉक केसांचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. ड्रेडलॉकला लॉक किंवा ड्रेड्स असंही म्हणतात. तुम्ही पाहिलेच असेल की साधू आणि अनेक लोकांचे केस दोरीसारखे दिसतात जे एका खास पद्धतीनं बनवले जातात. त्यांना ड्रेडलॉक्स म्हणतात.
हेही वाचा – नीरज चोप्राचं ‘ब्रम्हास्त्र’ झालं अमर..! ऑलिम्पिक गोल्ड जिंकलेला ‘भाला’ कुठं जाणार? वाचा इथं!
१३ वर्षांपूर्वी किती होती उंची
आशा यांनी ४० वर्षांपूर्वी त्रिनिदाद आणि टोबॅगो बेटावरून अमेरिकेतील न्यूयॉर्कला गेल्यानंतर केस वाढण्यास सुरुवात केली. ११ नोव्हेंबर २००९ रोजी आशा मंडेला यांच्या केसांची लांबी ५.९६ मीटर म्हणजेच १९ फूट ६.५ इंच होती आणि आज त्यांच्या केसांची लांबी ३३.५ मीटर म्हणजेच ११० फूट आहे.
आशा मंडेला यांच्या ११० फूट केसांचं वजन १९ किलो आहे. आशा त्यांचे केस कापडात बांधतात आणि कमरेला लटकवतात, यामुळे त्यांच्या मानेवर ताण पडत नाही. इमॅन्युएल चेगे असं आशा यांच्या पतीचं नाव आहे. ते केनियाचे एक व्यावसायिक लॉक स्टायलिस्ट आहे आणि केसांमध्ये ड्रेडलॉक तयार करतात. आशा दर आठवड्याला त्यांचे केस धुण्यासाठी एका वेळी ६ शॅम्पूच्या बाटल्या घेतात आणि ते सुकवायला पूर्ण दोन दिवस लागतात. याशिवाय त्यांची काळजी घेण्यासाठी किती तास लागतात हे मोजता येणार नाही.
हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : भाई, असा कॉन्फिडन्स हवा..! SIX मारण्यापूर्वी हार्दिकनं काय केलं? पाहा VIDEO
केसांमुळं मान आणि पाठीत त्रास होऊ शकतो, म्हणून डॉक्टरांनी त्यांना अनेकदा केस कापण्याचा सल्लाही दिला. पण केसांनी आशा यांच्यासाठी कमाईचं एक साधन उघडलं आहे. त्या हेअर प्रोडक्ट्स आणि अॅक्सेसरीजची जाहिरात करतात आणि दरवर्षी लाखो डॉलर्स कमावतात.