

World AIDS Day 2022 : ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम हा एड्स म्हणून ओळखला जातो. हा एक तीव्र रोगप्रतिकारक रोग आहे, जो एखाद्या व्यक्तीला हळूहळू मृत्यूकडे नेतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, २०२१ सालापर्यंत जगभरात सुमारे ३८ दशलक्ष लोक एचआयव्हीशी झुंज देत होते. गेल्या वर्षी जगात ६.५० लाख लोकांचा एड्समुळे मृत्यू झाला होता. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी लाखो प्रकरणे नोंदवली जातात. जागतिक एड्स दिनानिमित्त आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत की या आजाराचा लोकांवर कसा परिणाम होतो आणि तो कसा टाळता येईल.
एड्स म्हणजे काय आणि तो शरीरावर कसा हल्ला करतो?
डॉक्टरांच्या मते, सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की एचआयव्ही आणि एड्समध्ये मोठा फरक आहे. एचआयव्ही हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो रक्तातून रक्तामध्ये लोकांच्या शरीरात पसरतो. हा संसर्ग शरीरात आला की तो आयुष्यभर राहतो. काहीवेळा तो वर्षानुवर्षे लोकांना समस्या निर्माण करत नाही. जेव्हा हा विषाणू संसर्ग पसरतो आणि फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचतो, तेव्हा या स्थितीला एड्स म्हणतात. या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती निकामी होते आणि शरीराच्या विविध अवयवांचे नुकसान होऊ लागते.
हेही वाचा – Chanakya Niti : जीवनातील सर्वात कटू सत्य काय आहे? ‘इथं’ वाचा उत्तर!
World Aids Day 1 Desember 2022
Spread awareness not ignorance🙏#WorldAIDSDay #BTS_AHC_IDN pic.twitter.com/DGZQx1KoEp— (REST) BTS_ArmyHelpCenter INDONESIA (@BTS_AHC_IDN) December 1, 2022
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणे म्हणजे एड्स नाही का?
काही लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात, पण त्यांना एड्स होत नाही. असे लोक कोणत्याही गुंतागुंतीशिवाय आयुष्य जगू शकतात. व्हायरल लोड एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एचआयव्ही संसर्गाची व्याप्ती दर्शवते. एचआयव्हीवर योग्य वेळी उपचार केले तर एड्सची स्थिती आटोक्यात आणून टाळता येऊ शकते. आजच्या युगात अशी अनेक औषधे आहेत, जी या विषाणूवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकतात. लोकांनीही याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.
या चुकांमुळे होऊ शकतो एड्सचा प्रसार
डॉक्टरांच्या मते, एचआयव्ही संसर्ग रक्तामध्ये पसरतो. रक्त संक्रमण, वापरलेली सिरिंज, इतर व्यक्तीचे ब्लेड, असुरक्षित लैंगिक संबंध ही एचआयव्ही पसरण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. समलैंगिक लोकांना याचा धोका जास्त असतो, कारण असे लोक एकमेकांच्या रक्ताच्या संपर्कात सहज येऊ शकतात. जर तुम्हाला हिरड्यांचा त्रास होत असेल आणि रक्तस्त्राव होत असेल तर चुंबन घेतल्याने समोरची व्यक्ती एचआयव्ही संसर्गाचा बळी ठरू शकते. कोणत्याही प्रकारचे रक्त ते रक्त कनेक्शनमुळे संसर्ग पसरू शकतो. हस्तांदोलन करून किंवा एकत्र अन्न खाल्ल्याने एड्स पसरत नाही.
हेही वाचा – धक्कादायक..! रवीश कुमार यांचा NDTV मधून राजीनामा; म्हणाले, “गोदी मीडियाच्या…”
एड्सवर उपचार
एड्स तपासण्यासाठी एचआयव्ही अँटीबॉडी, एलिसा एचआयव्ही अँटीबॉडी आणि वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केली जाते. या चाचण्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी होते. तुम्ही रक्तदान करता, त्यावेळी एचआयव्हीची चाचणीही केली जाते. जर आपण उपचारांबद्दल बोललो, तर सर्व प्रथम डॉक्टर हे पाहतात की तुमच्या एचआयव्हीचा व्हायरल लोड काय आहे. जर ते खूप कमी असेल तर उपचारांची गरज नाही. जर ते जास्त असेल तर लक्षणांनुसार उपचार केले जातात. सध्या, खूप चांगली औषधे आहेत जी ९९% प्रकरणांमध्ये एचआयव्ही नियंत्रित करू शकतात. आजपर्यंत असे कोणतेही औषध बनलेले नाही ज्यामुळे ही समस्या मुळापासून दूर होईल. ते फक्त नियंत्रित केले जाऊ शकते.
एड्स टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय
- एखाद्याच्या रक्ताच्या संपर्कात येणे टाळा
- असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नका
- वापरलेल्या इंजेक्शनपासून अंतर ठेवावे
- कोणत्याही व्यक्तीचे ब्लेड शेअर करू नका.
- सिगरेट कोणाशीही शेअर करू नका
- शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या