World Rabies Day : कुत्रा चावल्यानंतर लगेच करा ‘या’ 3 गोष्टी!

WhatsApp Group

World Rabies Day : रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो कुत्रा, मांजर आणि माकडांसह काही प्राण्यांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो. सुमारे 99 टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा आजार कुत्रा चावल्याने पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगभरात दरवर्षी 59 हजार लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो. यापैकी 40 टक्के मुले 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे रेबीजची 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आशियाई आणि आफ्रिकन देशांतून नोंदवली जातात. रेबीज हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, जर संसर्ग एखाद्या व्यक्तीमध्ये पसरला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. या महिन्यात राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये 14 वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू झाला. मग रेबीजबद्दल अनेक चर्चा झाल्या आणि लोकांनीही खबरदारी घ्यायला सुरुवात केली. रेबीजबद्दल लोकांमध्ये माहितीचाही अभाव आहे.

रेबीजपासून बचाव करण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. 2007 मध्ये पहिल्यांदा रेबीज डे साजरा करण्यास सुरुवात झाली. हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा उद्देश रेबीजचा धोका आणि त्यापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करणे हा आहे. 28 सप्टेंबर 1895 रोजी रेबीजची लस तयार करणारे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन झाले. 1885 मध्ये त्यांनी रेबीजची लस तयार करून हा असाध्य रोग टाळण्याचा मार्ग शोधला होता. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी जागतिक रेबीज दिन म्हणून साजरी केली जाते. रेबीज रोग टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस योग्य वेळी दिली तर रेबीज टाळता येऊ शकतो.

रेबीजचा विषाणू कसा पसरतो? (World Rabies Day)

न्यूज 18 हिंदीच्या वृत्तानुसार दिल्लीतील यमुना विहार येथील हॅरी पेट्स क्लिनिक आणि सर्जरी सेंटरचे डॉ. हरवतार सिंह यांच्या मते, कुत्रा, मांजर आणि माकड चावल्याने रेबीज आणि इतर रोग होऊ शकतात. या प्राण्यांच्या लाळेमध्ये रेबीजचे विषाणू असतात. जेव्हा कुत्रा माणसाला चावतो तेव्हा रेबीजचा विषाणू त्याच्या लाळेद्वारे माणसाच्या रक्तात पोहोचतो आणि संसर्ग पसरतो. कुत्र्याच्या ओरबडण्यानेही रेबीज होऊ शकतो. पाळीव कुत्रे चावल्याने रेबीजचा धोका कमी असतो असे बहुतेकांना वाटते, पण तसे नाही. कुत्रा चावणे कधीही हलके घेऊ नये आणि एखाद्याने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अँटी रेबीज लस घ्यावी. कुत्रा पाळीव प्राणी असो वा भटका, सर्व कुत्र्यांच्या चाव्याव्दारे रेबीज पसरतो. मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवावे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : वाचा देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या अपडेटेड किमती

डॉक्‍टर सांगतात की, कुत्रा चावल्यानंतर लगेच प्राथमिक उपचार केले पाहिजेत. सर्व प्रथम, कुत्रा चावलेली जागा साबण आणि पाण्याने 15 मिनिटे सतत धुवा. कुत्र्याच्या लाळेतून निघणारा विषाणू साबणाने काढून टाकता येतो. त्यामुळे प्रथमोपचार अत्यंत आवश्यक आहे. जखम मोठी असल्यास त्यावर क्रीम लावू शकता. तथापि, प्रथमोपचारानंतर, एखाद्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि शक्य तितक्या लवकर अँटी-रेबीज लस घ्यावी. रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत द्यावा. लसीचा दुसरा डोस तिसऱ्या दिवशी, तिसरा डोस सातव्या दिवशी, चौथा डोस 14 व्या दिवशी आणि पाचवा डोस 28 व्या दिवशी दिला जातो. रेबीज प्रतिबंधक लसीचे एकूण 5 डोस दिले जातात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment